या नंबरवर द्या मिसकाॅल अन मिळवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी Mukhyamantri sahayata nidhi

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी:

नमस्कार बंधू आणि भगिनींनो कसे आहात बरे आहात ना ! नसाल तर  आज आपण पाहणार आहोत एक नवीन योजना  जी आपल्या आजारांवर उपचार करण्यासंदर्भात आहे ती म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना होय.

Mukhyamantri Sahayata Nidhi


  मित्रांनो आज पाहत आहोत  या धावपळीच्या जीवनात  आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी किती  वणवण करावी लागत आहे.एवढी पळापळ करुनही वेळेला उपयोग होत नाही.आज आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत.
    ग्रामीण भागात  माणसाला आजारी पडल्यावर किती हाल होतात. आजार जर साधा असेल तर ठीक नाहीतर आजार जर गंभीर स्वरूपाचा असेल तर  उपचारासाठी रूग्णांना कितीतरी वेळा मदत  होत नाही. प्रत्येक जण आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे असे नाही. सामान्य माणसाला उपचारासाठी मंत्रालयाच्या पायर्या झिजवाव्या लागतात अन् तरीसुद्धा मदत मिळते असे नाही.या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सर्व सामान्य माणसाला उपचारासाठी वणवण होऊ म्हणून  एक टोलफ्री नंबर दिला आहे त्यावर मिसकाॅल देऊन मग निधी मिळवता येईल.तो नंबर म्हणजे ८६५०५६७५६७ हा आहे. या नंबरवर कॉल करून  उपचारासाठी रूग्णांना निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.
    आपल्याला माहीत आहे की कर्करोग, ह्रदय रोग, गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, किडनी शस्त्रक्रिया, डायलिसिस, अपघात होणे यासाठी वेळेवर उपचार होणे गरजेचे असते परंतु पैसे असावी  रुग्णालयात रुग्णांना अर्धवट सोडून  न्यावे लागते आणि परीणाम स्वरूप रुग्ण दगावतात. यासाठी रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.   आज कर्करोग यावर सर्वांत जास्त अर्ज मंत्रालयात येतात.मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३ लाखाांपर्यंत तरतुद आहे.
    मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी फक्त एक मिसकाॅल देऊन मग निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वेबसाईट:  

  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ८६५०५६७५६७ या नंबरवर एक मिसकाॅल द्या. त्यानंतर तुम्हाला अर्जाची लिंक  एस एम एस द्वारे  प्राप्त होईल. त्याची प्रिंट काढून तो अर्ज भरून सर्व कागदपत्रे यांची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लवकरच एक ऍप तयार करण्यात येणार आहे.
   अशा प्रकारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी  रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे.

No comments

ही वेबसाईट सरकारी वेबसाईट नाही तर ही खाजगी वेबसाईट आहे.त्यावर कुठलीही स्प्याम कमेंट नको.वाचकाने सरकारी वेबसाईट वर जाऊन डिटेल्स पहावी.

पंतप्रधान पिक विमा योजना फक्त एक रुपयात Pik Vima Yojna 2023

  पंतप्रधान पिक विमा योजना २०२३-२०२४ Pik Vima Yojna 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहत आहोत की अनेक खाजगी कंपन्या आहेत की ज्या शेतकर...

Powered by Blogger.