पंतप्रधान पिक विमा योजना फक्त एक रुपयात Pik Vima Yojna 2023
![]() |
| पंतप्रधान पिक विमा योजना २०२३-२०२४ |
Pik Vima Yojna 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहत आहोत की अनेक खाजगी कंपन्या आहेत की ज्या शेतकरी बांधवांना पिकांसाठी वेगवेगळ्या विमा योजना घेऊन येतात आणि शेतकरी बांधवांना विमा काढण्यासाठी सांगतात.कधी दुष्काळ पडला तर कधी अतिवृष्टी झाली आणि परिणामी शेतकरी बांधवांना यांचे नुकसान सोसावे लागते.त्यामुळे शेतकरी विमा करतात . परंतु जास्त पैसे भरूनही विमा मंजूर केला जात नाही.
पंतप्रधान पिक विमा योजना ही सरकारने चालू केली आहे ती फक्त एक रुपयात.शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करुन एक रुपयात पिक विमा योजना काढायची आहे. त्यासाठी आपल्याला काय कागदपत्रे सादर करावी लागतील तसेच काय पात्रता असावी लागते हे पाहून आपण अर्ज करा.ही पिक विमा योजना खरिप आणि रब्बी हंगामातील 2023- 2024वर्षासाठी आहे. यासाठी नोंदणी तारीख ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे.
पेरणी ते काढणीपश्चात नुकसानीच्या सर्व टप्प्यातील नुकसान भरपाईस विमा घेणारे शेतकरी पात्र राहतील. त्याबरोबरच नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ आग, वीज पडणे, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, कीड, रोगराई, पावसाची अनियमितता, पूरपरिस्थिती, गारपीट, हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी न होणे, स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणीपश्चात नुकसान आदी कारणांसाठी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळणार आहे.
अर्जात भरावी लागणारी माहिती:
आवश्यक कागदपत्रे:
खालील ठिकाणी नोंदणी करा:
१.सार्वजनिक सेवा केंद्र
२.कृषि पतपुरवठा करणार्या सहकारी संस्था
३.ऑनलाईन वेबसाईट
https://pmfby.gov.in
अशा प्रकारे शेतकरी बांधवांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना आहे.या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घ्यावा.

Post a Comment