संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi Niradhar Yojna Maharashtra

 संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi Niradhar Yojna Maharashtra:

   नमस्कार मित्रांनो आज आपण अशी योजना पहाणार आहोत की त्यामुळे समाजातील सर्व सामान्य नागरिकांना या योजनेचा फायदा होईल.आपल्या समाजातील  दुर्बल घटक  म्हणजे निराधार  नागरिक , आर्थिक दृष्ट्या दुर्बल ज्यांना कुणाचाही आधार नाही असे, विधवा महिलांसाठी, घटस्फोटीत महिला, पोटगी न मिळालेल्या महिला, समाजातील गरीब कष्टकरी शेतकरी बंधू आणि भगिनींना, तसेच अपंग व्यक्तींना उदरनिर्वाह चालवता यावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित ही योजना आहे.या योजनेअंतर्गत पूर्वी ५००ते७००रुपये मिळायचे आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढे कोणीही या योजनेपासून वंचित राहू नयेत म्हणून  हा एक प्रयत्न आहे.तर या योजनेत लाभ घेणाऱ्या नागरिकांना  काय कागदपत्रे सादर करावी लागतील तसेच काय पात्रता असावी ते आपण पाहणार आहोत.

संजय गांधी निराधार योजना आता महिन्याला मिळणार १०००/ रुपये


पात्रता:

१.या योजनेअंतर्गत पात्र महिला ६५ वर्षे वयाच्या कमी असावी.

२ कुटुंबातील वार्षिक उत्पन्न २१००० रुपये पेक्षा कमी असावे.

३.एक व्यक्ती निराधार कुटुंबाला ६००/रुपये प्रति महिना एका पेक्षा अधिक निराधार महिला ९००/ प्रति महिना वेतन राहील.

४.अपंग व्यक्ती, क्षयरोग, कर्करोग,HIV+, कुष्ठरोग या आजारांमुळे स्वतः चे कुटुंब चालू न शकलेले स्त्री आणि पुरुष.

निराधार महिला व निराधार पुरुष, विधवा, घटस्फोटीत महिला, घटस्फोटीत परंतु पोटगी न मिळालेल्या महिला

कमी उत्पन्न असलेल्या महिला

वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला

शेतमजूर महिला

आत्महत्या केलेल्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या स्त्रिया.

आवश्यक कागदपत्रे:

१.वयाचा दाखला- यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, मतदान कार्ड, वैद्यकीय अधिकारी यांचा वयाचा दाखला.

२.उत्पन्नाचा दाखला-तहसीलदाराचा उत्पन्न दाखला,द्रारिद्रय रेषेखालील कुटुंबातील सदस्य उतारा

३.रहिवाशी दाखला-ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी दाखला

४.अपंगाचे प्रमाणपत्र-
अस्थिव्यंग ,अंध, मुकबधीर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंग  प्रमाणपत्र

 आजारी असल्याचा दाखला-जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला
 ५. अनाथ असल्याचा दाखला-ग्रामसेवक, मुख्य अधिकारी, गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी यांचा दाखला

 संजय गांधी निराधार योजना अटी: 


 १.ती व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

 २.कुटुंबातील वार्षिक उत्पन्न २१०००/रुपये असावे.

 ३.या योजनेसाठी अपत्याची अट नाही.

 ४. व्यक्तीला ४०%अपंगत्वाचा दाखला पाहिजे.

 ५.विधवा महिला  पात्रं असेल.

 ६.शासनाच्या इतर योजनेतील लाभार्थी पात्र असतील.

 ७.लाभार्थ्याची मुले २१ वर्षांची होईपर्यंत लाभ मिळणार. 

 ८.लाभर्थ्याला मुलीच असतील व त्यांचे वय २५पेक्षा जास्त आहे किंवा त्यांचे लग्न झाले आहे तरीही त्याला लाभ मिळणार.

 ९.योजना मंजूर करायची की नाही हे अधिकारी वर्ग ठरविल.
  
   अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजना आहे.ही योजना चालू करण्यात आली याचा उद्देश असा आहे की समाजातील सर्व सामान्य माणसाला , दुर्बल घटक यांना मदत व्हावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने ही योजना चालू करण्यात आली आहे.



No comments

ही वेबसाईट सरकारी वेबसाईट नाही तर ही खाजगी वेबसाईट आहे.त्यावर कुठलीही स्प्याम कमेंट नको.वाचकाने सरकारी वेबसाईट वर जाऊन डिटेल्स पहावी.

पंतप्रधान पिक विमा योजना फक्त एक रुपयात Pik Vima Yojna 2023

  पंतप्रधान पिक विमा योजना २०२३-२०२४ Pik Vima Yojna 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहत आहोत की अनेक खाजगी कंपन्या आहेत की ज्या शेतकर...

Powered by Blogger.