आता घरबसल्या मिळणार रेशनकार्ड तेही फुकट online e reshan card scheme
Online e reshan card scheme: नमस्कार मित्रांनो आज आपण सर्वांसाठी खुशखबर घेऊन आलो आहोत ती म्हणजे आता घरबसल्या नागरिकांना ऑनलाईन रेशनकार्ड तेही अगदी फुकट.आहे ना फायद्याची गोष्ट.
आजपर्यंत आपण पाहत आलो आहोत नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी दरबारी किती दिवस हजेरी लावून आपण थकलो आहोत.आजपर्यंत रेशनकार्ड काढणे सोपी गोष्ट राहिलेली नाही.त्यामध्ये खाजगी एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे.नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी दोन दोन हजार रुपये एजंटांना देऊन मग ते रेशनकार्ड मिळते.सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारे आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आणि मग आर्थिक पिळवणूक सोसावी लागते.ही होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.सरकारी काम आणि सहा महिने थांब अशा प्रकारे शासन दरबारी चकरा माराव्या लागुन जी सामान्य माणसाला होणारे हाल कमी व्हावा यासाठी दुरदृष्टी ठेवून त्यावर उपाय म्हणून पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. ही रेशनकार्ड काढुनी दोन दोन वर्षे रेशन मिळत नाही. त्यात ऑनलाईन रेशनकार्ड काढुनी सुध्दा रेशन मिळत नाही, ही होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.वीस रुपयांमध्ये मिळणाऱ्या रेशन साठी दोन हजार रुपये एजंटांना मोजावे लागतात आणि हा एजंटापासून होणारा त्रासही कमी होण्यासाठी प्रयत्न केला आहे.
Online e reshan cardकाढण्याची पध्दत:
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना; तसेच राज्य योजनेच्या सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा मोफत देण्यात येणार आहे. अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी http://rcmc.mahafood.gov.in या वेबसाइटवरून ही ई-शिधापत्रिका डाउनलोड करता येईल.
वीस दिवसांची मुदत
ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जदाराची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी संकलित करणार आहेत. त्यानंतर अर्जदार नेमका कोणत्या प्रकारातील आहे यावरून त्याचे रेशन कार्ड किती दिवसांत मिळेल हे ठरणार आहे. अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच रेशन अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच २० दिवसांची मुदत असणार आहे. पांढरे रेशन कार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वीप्रमाणे सात दिवसलागणार आहे. रेशन कार्ड अंतिम झाल्यानंतर त्याला ते ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहे. त्यात रेशनसाठी त्याला कोणते दुकान मिळाले आहे, याचाही उल्लेख असणार आहे.
अशा प्रकारे सर्व सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी शासनाचा हा प्रयत्न आहे.कशी वाटली खुशखबर आहे ना फायद्याची गोष्ट अशीच माहिती आणखी घेऊन येऊ धन्यवाद.

Post a Comment