One farmer one transfer scheme 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज आपण पाहणार आहोत अशी योजना जी आपल्या सर्वांच्या उपयोगाची आहे.ज्यामुळे या योजनेचा सर्वांना लाभ घेता येणार आहे.या योजनेमागचा उद्देश काय आहे आणि यासाठी काय कागदपत्रे सादर करावी लागतील तर जाणून घेऊया ही योजना.
Ek shetkari ek DP Yojna Maharashtra 2022:
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने१४एप्रिल २०१४चालू करण्यात आलेली एक शेतकरी एक डिपी योजना मंत्री मंडळात मंजूर करण्यात आली आहे. तसेच १४ऑक्टोबर २०२० रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले आहे. मार्च २०१४ पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते, त्यामध्ये २ लाख २४ हजार७८५ शेतकर्यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते. राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीवघेणा धोक्यात येऊ नये उभा सर्व बाबींचा विचार करूनएचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेचा आतापर्यंत ९० हजार शेतकर्यांना लाभ झाला आहे. ११३४७ कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे.
शेतकरी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेचे मुख्य उद्देश:
लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे
विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे
तांत्रिक वीज हानी वाढणे
रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
विद्युत अपघात
लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे
अश्या प्रकारच्या गंभीर समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यामुळे अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे. यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून, अनधिकृत वीज जोडणी होणार नाही.
एक शेतकरी एक योजनेचे फायदे –
ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील.
अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व ५,००० रुपये द्यावे लागतील.
एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे –
आधार कार्ड
मोबाइल नंबर
शेताचे ७/१२ प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
बँक खाते क्रमांक
Important Links –
अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. – wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=English
ऑफिसिअल वेबसाइट – mahadiscom.in
हेल्पलाईन नंबर –
शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०
महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४३५
१८००-२३३-३४३५
Post a Comment