भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड १००% शेतकरी अनुदान योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड १००% शेतकरी अनुदान योजना : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सर्वांसाठी घेऊन आलो आहोत अशी योजना जी आपल्या सर्वांच्या उपयोगाची आणि फायद्याची आहे.आजपर्यंत जर आपण कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नसेल तर आपल्याला एक सुवर्णसंधी चालून आली आहे नक्कीच आपल्याला या संधीचे सोने करता येईल चला तर मग जाणून घेऊया.
महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना २०२३: या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना अनेक योजना राबविल्या जात आहेत आणि त्यामध्ये कृषी यंत्रे आणि अवजारे उपलब्ध करून दिली जात आहे.त्यातीलच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या नवीन आर्थिक वर्ष्याच्या अंमलबजावणीसाठी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी रुपये ६ कोटी अर्थसंकल्पिय निधीची तरतूद करण्यात आली होती. त्याच अर्थसंकल्पीय तरतुदीच्या २०% म्हणजेच १ कोटी २० लाख एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी १७ फेब्रुवारी , २०२१ रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आली. सदर निधी शासन निर्णयान्वये कृषी विभाग कृषी आयुक्तालय यांना वितरित करण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे.
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना Gr :
राज्यात हि योजना २०२०-२१ मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ४०% च्या मर्यादेत खर्च करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता २२ जानेवारी २०२१ रोजी मंजूर झालेल्या gr मध्ये देण्यात अली आहे.
सदर मंजूर शासन निर्णयामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. १००००.०० लाख मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ४० टक्के च्या मर्यादित म्हणजेच रु. ४०००. ०० लाख एवढ्या रकमेस प्रशासनाकडून मान्यता दिली आहे. एकूण ४००००. ०० लाख निधीपैकी रु. २०००. ०० लाख निधी यापूर्वीच कृषी आयुक्त कार्यालयास वितरित करण्यात आला आहे. आणि उर्वरित रुपये. २०००. ०० लाख निधी कृषी आयुक्त यांना अर्थसंकल्प वितरित करण्याचा नवीन शासन निर्णय २२ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आला.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता व कागदपत्रे :
लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.
सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना लय योजनेचा लाभ देय नाही.
शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

Post a Comment